Thursday, May 2, 2024
Homeनगरहिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे तर उपसरपंचपदी पोपटराव पवार

हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे तर उपसरपंचपदी पोपटराव पवार

अहमदनगर l प्रतिनिधी l Ahmednagar

आदर्श गाव हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे तर उपसरपंचपदी पद्मश्री पोपटराव पवार यांची बिनविरोध निवड झाली.

- Advertisement -

तर बु-हाणनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रावसाहेब कर्डीले यांची निवड झाली आहे. तर उदलमलमध्ये जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे.

हिवरेबाजार ग्रामपंचायतीची ३० वषार्नंतर प्रथमच निवडणूक झाली होती. या निवडणुकीत पुन्हा पोपटराव पवार यांनी वर्चस्व सिध्द केले होते. दरम्यान, मंगळवारी (दि.९) सरपंच, उपसरपंच निवडी झाल्या. यात पोपटराव पवार यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे.

बु-हाणनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रावसाहेब कर्डिले यांची निवड झाली आहे. उदरमल ग्रामपंचायतीत ७ पैकी ६ जागा जिंकूनही सत्ताधारी गटाला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. आरक्षणाचा उमेदवार नसल्याने येथे एकमेव निवडून आलेले जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या