रावेर|प्रतिनिधी Raver
येथील पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांची निवड झाली आहे.त्यांनी बुधवारी सभापती पदाचा पदभार स्वीकारला.
- Advertisement -
रावेर पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाचा राजीनामे देण्यात आल्याने,रिक्त जागी जिल्हा परिषदेचे साकळी गटाचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांनी वर्णी लागली आहे.बुधवारी ते पदभार स्वीकारण्यासाठी रावेर आले होते.यावेळी मावळते सभापती जितु पाटील यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.याप्रसंगी प्रभारी गट शिक्षण अधिकारी शैलेश दखने यांच्याशी रिक्त पदाबाबत त्यांनी चर्चा केली.यावेळी जि.प.सदस्य कैलास सरोदे,भाजप तालुका अध्यक्ष राजन लासूरकर,सरचिटणीस सी एस पाटील,संदीप सावळे व पदाधिकारी उपस्थित होते.