Friday, May 3, 2024
Homeनाशिकअशोका मेडिकव्हर गुंतागुंतीची शस्रक्रिया यशस्वी

अशोका मेडिकव्हर गुंतागुंतीची शस्रक्रिया यशस्वी

नाशिक । प्रतिनिधी

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नाशिक येथे 146 वजन असलेल्या महिलेची सिझेरियन प्रसुती करण्यात आली. वजन जास्त असल्याने महिलेला आरोग्य समस्या अधिक प्रमाणात होत्या. उच्चरक्तदाब, मधुमेह, थायरॉईड आणि अंगावर सूज अशा अनेक समस्यांना सांभाळून महिलेची प्रसूती करणे अतिशय जोखमीचे आणि कौशल्याचे कार्य अशोका मेडिकव्हर रुग्णालयातील प्रसिद्ध डॉ. प्रणिता संघवी (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ) यांनी तब्बल 2 तास शस्त्रक्रिया करून केले…

- Advertisement -

सर्व प्रकारच्या आरोग्य समस्या असल्याने बाळाचीही प्रकृती नाजूक होती, बाळाचे ठोके कमी होत होते, अंगावर सूज होती आणि बाळाला रक्त प्रवाह कमी होत होता त्यामुळे पर्यायाने बाळही अनेक अडचणींना सामोरे जात होते. परंतु बाळाला आणि आईला कोणतीही इजा न होऊ देता स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉ. प्रणिता संघवी यांनी आपला अनुभव आणि कौशल्य वापरून सुखरूप प्रसूती केली. या सर्व प्रक्रियेत रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख (बालरोग व नवजात शिशु तज्ञ) आणि इतर अनुभवी कर्मचार्‍यांनी मोलाचे सहकार्य केले. दोन ते तीन दिवस रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तज्ञांच्या देखरेखीत ठेवल्यानंतर महिलेस सामान्य कक्षात हलवण्यात आले. सध्या आई आणि बाळाची प्रकृती स्थिर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या