Friday, May 3, 2024
Homeनाशिककॅन्टोन्मेंट निवडणुकीसाठी एप्रिलपर्यत अंतिम मतदार यादी

कॅन्टोन्मेंट निवडणुकीसाठी एप्रिलपर्यत अंतिम मतदार यादी

देवळाली कॅम्प । Deolali Camp

देवळाली छावणी मंडळाच्या निवडणुकीसाठी 30 एप्रिलला अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. या संबंधीचे आदेश संरक्षण मंत्रालयाचे उपसंचालक राजेश कुमार सहा यांनी याबाबत नुकतेच आदेश पारित केले आहे.

- Advertisement -

कॅन्टोन्मेंट निवडणूक कायद्याच्या कलम 10 (1) आणि 12 नुसार दरवर्षी मतदार यादी सुधारण्याचे काम सुरू करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या दरवर्षी जुलै दरम्यान मतदार याद्या अंतिम करण्याचे केले जाते.

या वर्षी मात्र सर्व छावणी मंडळांना करोनामुळे तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. आता सात महिन्यानंतर या प्रक्रिया पुन्हा राबवून 30 एप्रिल ला अंतिम मतदार यादी जाहीर करण्याच्या सूचना संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देण्यात आल्या आहे. केंद्र सरकारने छावणी मंडळांना मतदार यादी सुधारण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने याच वर्षी लवकरात लवकर निवडणुका घेण्याचे नियोजन केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व सदस्यांची 10 फेब्रुवारी रोजी मुदत संपली होती. त्यामुळे बोर्ड बरखास्त करण्यात आले होते. सध्या द्विसदस्यीय समितीच्या माध्यमातून बोर्डाचा कारभार पाहिला जात आहे. याशिवाय नामनिर्देशित सदस्य होण्यासाठी देवळालीतील विविध राजकीय पक्ष व मान्यवरांकडून प्रयत्न केले जात असल्याचेही समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या