नाशिक | Nashik
सीबीएसईचे नवे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. नववी आणि अकरावीच्या परीक्षा घेण्याची सूचनाही मंडळाने केली आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळ शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले. दहावी, बारावीच्या परीक्षाही रखडल्या. मात्र, तरीही पुढील शैक्षणिक वर्ष नियमित वेळापत्रकाप्रमाणेच सुरू करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
नवे शैक्षणिक वर्ष जाहीर करण्याबरोबरच नववी आणि अकरावीच्या परीक्षा घेण्याची सूचनाही मंडळाने केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर नववी आणि अकरावीच्या परीक्षांबाबतही पालकांकडून सातत्याने विचारणा करण्यात येत होती.
या परीक्षा घेण्याची सूचना मंडळाने केली. वर्षभर ऑनलाइन वर्ग सुरू होते. विद्यार्थ्यांना नव्या माध्यमातून शिकताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. अनेकांना तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन वर्गामध्ये सहभागी होता आले नाही.
या पार्श्वभूमीवर अध्ययन-अध्यापनातील त्रुटी ओळखून नव्या शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला विशेष वर्ग घेण्यात यावेत. त्यानंतर परीक्षा घेण्यात याव्यात, अशा सूचनाही मंडळाने दिल्या आहेत.