Monday, May 6, 2024
Homeक्रीडा‘अक्षर’ची किमया, इंग्लंड ११२ धावांमध्ये गारद

‘अक्षर’ची किमया, इंग्लंड ११२ धावांमध्ये गारद

अहमदाबाद

भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांवर आटोपला फिरकीपटू अक्षर पटेलने सहा बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजांना तंबूत पाठवले.

- Advertisement -

अहमदाबाद टेस्टच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा फक्त ११२ धावांवर ऑल आऊट झाला आहे. भारताकडून अक्षर पटेलने ६, अश्विनने ३ तर इशांत शर्माने एक विकेट घेतली. अक्षर पटेल आणि अश्विनच्या फिरकीने तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या बॅटिंगची दाणादाण उडाली आहे.

या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण इशांत शर्माने सुरूवातीलाच इंग्लंडला पहिला धक्का दिला. ओपनर डॉमनिक सिबले शून्य रनवर माघारी परतला, यानंतर मात्र अक्षर आणि अश्विनने इंग्लंडला सावरूच दिलं नाही.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने ही टेस्ट दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातली ही टेस्ट डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवण्यात येत आहे. या मॅचसाठी भारताने टीममध्ये दोन तर इंग्लंडने चार बदल केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या