Friday, May 3, 2024
Homeनगरदेवा पाव रे... करोनावर घाव घाल रे...

देवा पाव रे… करोनावर घाव घाल रे…

मध्यंतरी कमी झालेला करोनाचा प्रादूर्भाव आता पुन्हा वाढू लागला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने करोना नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्याने आदेश काढले आहेत. त्याचा परिणाम आजच्या अंगारकी चतुर्थीच्या उत्साहावरही झाला. शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाड्यातील श्री विशाल गणेश मंदिरात मास्क परिधान करून व सोशल डिस्टन्स ठेवून भक्तांकडून दर्शन घेतलेे. देवा पाव रे… करोनावर घाव घाल रे अशी प्रार्थनाही भक्तांनी श्रीगणेशाजवळ केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या