Friday, May 3, 2024
Homeनाशिकक्लाऊड सर्व्हिसेस सुविधा उपलब्ध करून देणार : महापौर कुलकर्णी

क्लाऊड सर्व्हिसेस सुविधा उपलब्ध करून देणार : महापौर कुलकर्णी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिका नागरिकांना देत असलेल्या सुविधा याबाबत महाराष्ट्र शासन माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी काही तज्ज्ञ सल्लागार संस्था तीन वर्षा कालावधीकरिता नियुक्त केलेल्या आहेत.

- Advertisement -

यातील मुदत संपलेल्या मे. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या संस्थेला महासभा ठराव क्रमांक 498 नुसार मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नाशिककरांना क्लाउड सर्व्हिसेस सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याची माहिती महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी दिली.

नाशिक शहरातील नागरिकांना नाशिक महानगरपालिका माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत पुरवण्यात येणार्‍या विविध नागरी सेवांच्या कामकाजात पारदर्शकता यावी तसेच सदरचे सेवा या नागरिकांना जलद गतीने व विनाविलंब उपलब्ध करून घेणेकरिता विविध नागरी सेवांचे संगणकीकरण करण्यात आलेली आहे. यात प्रामुख्याने नागरी सुविधा केंद्रातील विविध पंचावन्न सेवा अंतर्भूत आहेत.

याकरिताच नाशिककरांना क्लाउड सर्व्हिसेस सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मुदत संपलेल्या मे. एस. डी.एस.सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या संस्थेला मुदतवाढ देण्यात आली आहे. तेव्हा नागरिकांना पुरविण्यात येणार्‍या सेवा-सुविधा यांचा वापर नागरिकांनी अधिकाधिक मोठ्या प्रमाणावर करावा असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या