Friday, May 3, 2024
Homeनाशिकरस्त्यावरील हातगाड्या, ठेले सायंकाळी सातनंतर बंदच

रस्त्यावरील हातगाड्या, ठेले सायंकाळी सातनंतर बंदच

नाशिक । Nashik

करोना संसर्गामुळे जिल्हाप्रशासनाने निर्बंध जारी केले असून हॉटेल्स, परमिटरु, बार, रेस्टॉरंट ५० टक्क्यांच्या मर्यादेसह सकाळी ७ ते रात्री ९ य‍‍ा वेळेत खुली ठेवण्याची परवानगी दिली असून रस्त्यावरील अन्नपदार्थांचे स्टाॅल, ठेले या ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळणे शक्य नसल्याने ते सायंकाळी ७ नंतर बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जारी केले आहेत.

- Advertisement -

शहरासह जिल्ह्यात करोना संसर्गाने पुन्हा डोकेवर काढले असून काल तब्बल १३०० रुग्ण करोना पाॅझिटिव्ह आढळले. करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा, दुकाने वगळता इतर सर्वच बाबींवर सायंकाळी ७ नंतर बंदी लागू कऱण्यात आली.

यातून केवळ हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, परमीट रुम यांना सुट देत ९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली. परंतू हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसह याच प्रवर्गात मोडणाऱ्या विविध खाद्य पदार्थ्यांच्या हातगाड्यांही ९ पर्यंत सुरुच होत्या. पण आता या हातावर पोट भरणाऱ्या हातगाड्यांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी लादली आहे.

या खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांच्या अवतीभवती गर्दी होत असल्याने त्यांच्यावर बंदी लादल्याचे स्पष्ट केले असून, शनिवारी, रविवारीही त्या पुर्णपणे बंदच असतील. केवळ हाॅटेल्स, रेस्टॉरंट, बार, परमीट रुम अशी बंदीस्थ असलेली अस्थापणाच ५० टक्के टेबल आणि कर्मचारी संख्येनुसार या अस्थापणा सुरु ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.

त्यामुळे आता सायंकाळी ७ वाजेनंतर चायनीज गाडी, पाणीपुरी, भेलपुरीसह समोसा, व़डापावच्या गाड्याही बंद ठेवाव्या लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापण कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे गाडे व ठेले या ठिकाणी सोशल डिस्टनन्स पाळणे शक्य नाही. त्यामुळे ही दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंतच खुली राहतील.

चिकण, मटणची दुकाने सुरु

चिकन, मटण,अंडी विक्री दुकाने शनिवार व रविवार सुरू राहतील. हे सर्व अन्नपदार्थ असल्यामुळे जीवनावश्यक या प्रवर्गात मोडतात. त्यामुळे ती केव्हाही सुरु राहू शकतात असे जिल्हाप्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या