Monday, May 6, 2024
Homeनगरशिक्षक बँकेची २८ मार्चला सर्वसाधारण सभा

शिक्षक बँकेची २८ मार्चला सर्वसाधारण सभा

अहमदनगर | प्रतिनिधी

राज्यातील पगारदार नोकरांच्या आर्थिक संस्थेमध्ये अग्रणी असणारी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या

- Advertisement -

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सन 2019 20 ची वार्षिक सभा 28 मार्च रोजी ऑनलाइन संपन्न होणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन राजू राहणे व व्हाईस चेअरमन उषाताई बनकर साबळे यांनी दिली.

करोनामुळे सहकार खात्याच्या निर्देशानुसार ही सभा ऑनलाइन झूम अँपवर घेण्यात येणार आहे. सालाबाद प्रमाणे अनेक महत्त्वाच्या विषयांना या सभेत मंजुरी देण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रमुख मुद्दा म्हणजे या वेळी बँकेच्या संचालक मंडळाने आपला स्टाफिंग पॅटर्न कमी करून व्यवस्थापन खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांची संख्या 30 ने कमी करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले .

गुरुमाऊली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांपूर्वी सर्वांच्या सहकार्याने गुरुमाऊली मंडळ बँकेमध्ये सत्तेत आलं. सभासदांनी दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवित वेळोवेळी सभासदांकडून प्राप्त झालेल्या सूचनांप्रमाणे विद्यमान संचालक मंडळाने कारभार केला. आम्ही सत्तेत आल्यापासून बँकेचा विकास आणि केलेली सभासदा भिमुख कामे यामुळे या वेळी सुद्धा गुरुमाऊली मंडळच सत्तेवर येईल असा ठाम विश्वासही राहणे व बनकर यांनी व्यक्त केला.

गुरुमाऊली मंडळाचे राजकुमार साळवे व सर्व नेते कार्यकर्ते आणि बँकेचे कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने बँकेने या योजना राबविल्या असून बँकेचा सभासद चिंतामुक्त करण्याचे काम या संचालक मंडळाने केले आहे येणारी वार्षिक सभा यशस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे असे आवाहन बँकेचे चेअरमन राजू राहणे, व्हाईस चेअरमन उषाताई बनकर, माजी चेअरमन संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप,शरद सुद्रिक, माजी व्हा चेअरमन विद्युल्लता आढाव,दिलीप औताडे, बाळासाहेब मुखेकर,अर्जुन शिरसाठ,सीमाताई निकम, नानासाहेब बडाख,ज्येष्ठ संचालक सलीमखान पठाण, गंगाराम गोडे, किसन खेमनर, बाबा खरात,अनिल भवार, राजु मुंगसे,अविनाश निंभोरे,मंजूताई नरवडे,संतोष अकोलकर, सुयोग पवार,.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या