Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशदेशातील नव्या करोना बाधितांपैकी 61 टक्के महाराष्ट्रातील

देशातील नव्या करोना बाधितांपैकी 61 टक्के महाराष्ट्रातील

नवी दिल्ली –

करोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत असून देशातील नव्या करोनाबाधितांपैकी 61 टक्के बाधित महाराष्ट्रातील आहेत

- Advertisement -

अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

गुरुवारी देशात 23,285 नवे बाधित आढळून आले. महाराष्ट्रात सर्वाधिक 14,317 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली असून, एका राज्याची ही सर्वाधिक मोठी आकडेवारी आहे. वाढत्या संसर्गात महाराष्ट्रात 31 ते 40 या वयोगटातील बाधितांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

केरळमध्ये 2,133, तर पंजाबमध्ये 1,305 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. केंद्र सरकार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना सक्रियपणे मदत करीत आहे. विशेषत: ज्या राज्यांमध्ये नव्या बाधितांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे, अशा राज्यांना प्राधान्य देण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या