Monday, May 6, 2024
Homeनगरमेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांचा 22 मार्चपासून सत्याग्रह

मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांचा 22 मार्चपासून सत्याग्रह

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या भूमिकेमुळे कामगारांच्या पगारवाढी प्रश्नी तोडगा निघत नसल्याने लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा

- Advertisement -

कामगार युनियनच्या वतीने सोमवार (दि.22) पासून वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग मुक सत्याग्रह करण्याचा इशारा दिला आहे. सदर प्रश्नी येत्या आठ दिवसात तोडगा काढून कामगारांना योग्य पगारवाढ देण्याच्या मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले असल्याची माहिती लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष लांडे व युनिट अध्यक्ष सतीश पवार यांनी दिली.

अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत मार्च 2020 मध्ये संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची मागणी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने लावून धरली आहे. निवेदनावर संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभा पाचारणे, सुनिता जावळे, प्रविण भिंगारदिवे यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या