Sunday, May 5, 2024
Homeनगर2022 पर्यंत निळवंडेच्या कालव्यांद्वारे पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न- ना. थोरात

2022 पर्यंत निळवंडेच्या कालव्यांद्वारे पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न- ना. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

निळवंडेचे मागील पाच वर्षे काम थांबले होते. आता पुन्हा महाविकास आघाडी सत्तेवर येताच दुसर्‍या दिवसापासून कालव्यांच्या कामाला गती दिली.

- Advertisement -

चालू अर्थसंकल्पात भरीव निधी मंजूर केला या कामासाठी अजूनही निधी उपलब्ध करून देणार असून 2022 पर्यंत दुष्काळी भागात कालव्यांद्वारे पाणी देण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न राहील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 53 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पा. खेमनर, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, शिवाजीराव थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, अमित पंडित, शंकरराव खेमनर, उपाध्यक्ष संतोष हासे, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, गणपतराव सांगळे, साहेबराव गडाख, संपतराव डोंगरे, सुभाष सांगळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

ना. थोरात म्हणाले, 5500 मेट्रिक टन क्षमतेच्या कारखाना व 30 मेगावॅट वीज निर्मितीचा हा निर्णय अत्यंत दूरदृष्टीचा ठरला आहे. यावर्षी सर्वत्र ऊस जास्त प्रमाणात उपलब्ध असून कारखान्याने 10 लाख मेट्रिक टनाच्यापुढे गाळप केले आहे. विद्युत प्रकल्पातून हि कारखान्याला चांगले उत्पादन होत असून नव्याने सुरू केलेला इथेनॉल प्रकल्पामुळे कारखान्याच्या उत्पादनात भर पडणार आहे.

कारखान्याची वाटचाल चांगली असून अधिक कार्यक्षमतेने काम करताना हा लौकिक यापुढेही असाच राहील. तसेच सभासदांनी हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करावा. या सहकारी संस्थांमुळे सामान्य माणसाच्या जीवनात आनंद झाला आहे. निळवंडे धरण आपल्या जीवनाचे ध्येय मानून पूर्ण केले. 2012 पर्यंत भिंतीसह कालव्यांची कामे मार्गी लावली. 2014 ते 2019 या कालखंडामध्ये अतिशय संथगतीने काम सुरू होते.

कालव्यांच्या कामावर अवघे 2-3 पोकलँड काम करत होते. मात्र महाविकास आघाडी सत्तेवर येताच आपण दुसर्‍या दिवसापासून कामाला पुनश्च गती दिली. पस्तीस-चाळीस पोकलँड ने काम सुरू केले. मागील वर्षी करोनाची संकट आले. मजुरांचा प्रश्न उद्भवला. अशा काळात जास्तीत जास्त लक्ष देऊन 0 ते 28 ची कामे जलद गतीने मार्गी लावण्यासाठी काम केले. विविध ठिकाणी स्ट्रक्चरचे काम सुरू आहे.

या वर्षी चालू अर्थसंकल्पातून चांगला निधी मिळवला. 2022 पर्यंत कालव्यांद्वारे पाणी देणे हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे. या प्रश्नामध्ये आपण कधीही राजकारण केले नाही. जे राजकारण करतात त्यांना महत्त्व देऊ नका हा पाण्याचा प्रश्न आहे. जिल्हा बँकेने शेतकर्‍यांच्या जीवनात मोठे आनंद निर्माण केला आहे. या बँकेला आर्थिक शिस्त अत्यंत महत्त्वाची असून सर्व कारखान्यांचा सभासदांनी व कर्जदारांनी वसुली नियमित देणे अत्यंत गरजेचे आहे.

महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांना 50 हजार रुपये व दोन लाखांपर्यंत कर्ज माफीसाठी दिलेल्या शब्द हे सरकार पूर्ण करणार आहे त्यामुळे कोणीही संभ्रमावस्था निर्माण करू नये असेही ते म्हणाले. आमदार डॉ. तांबे म्हणाले, कारखान्याने इथेनॉल प्रकल्प व सीपी यूनीट नव्याने सुरू केले आहे हे सर्व उपक्रम इतरांसाठी दिशादर्शक असल्याचे ते म्हणाले

कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ म्हणाले, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण व सर्व संचालक मंडळ अत्यंत कार्यक्षमपणे काम करत आहे. या वर्षी जास्तीत जास्त ऊस गाळप करून उच्चांकी विक्रम करण्याची संधी आहे. पूर्ण कार्यक्षमतेने काम करताना सभासदांना व कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना मोठा दिलासा देणार असल्याचेही ते म्हणाले

यावेळी संचालक चंद्रकांत पा कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे, अभिजीत ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, माणिक यादव, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, मीराताई वर्पे, मंदाताई वाघ, किरण कानवडे, शंकर धमक, नानासाहेब शिंदे, राजेंद्र गुंजाळ, केशवराव दिघे, राजेंद्र कढणे यांसह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. ऑनलाईन सभेत मोहनराव करंजकर, प्रभाकर कांदळकर, विलास वर्पे, रामनाथ कुर्‍हे, भास्कर शेरमाळे, मुरली अप्पा खताळ आदींनी ऑनलाइन सहभाग घेतला.

प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले. नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. डी. एस. भवर यांनी मागील सभेच्या वृत्ताचे वाचन केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर संतोष हासे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या