Thursday, May 9, 2024
Homeनाशिकसौर पथदीपांनी 35 गावे उजळणार

सौर पथदीपांनी 35 गावे उजळणार

सिन्नर । Sinnar (प्रतिनिधी)

जिल्हा नियोजन समितीच्या अपारंपरिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत सिन्नर विधानसभा मतदारसंघातील 35 गावांमध्ये सौर पथदीप व हायमास्ट बसवण्यासाठी 1 कोटी 2 लाख 76 हजारांचा निधी मंजूर झाला असून आमदार माणिकराव कोकाटेंच्या प्रयत्नातून तालुक्यासह मतदारसंघात समाविष्ट असलेल्या टाकेद गटातील गावे उजळणार आहेत.

- Advertisement -

जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आ. कोकाटे यांनी मतदारसंघातील गावांमध्ये सौर ऊर्जेवर आधारित पथदीप व हायमास्ट बसविण्याच्या कामासाठी प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला होता.

आ. कोकाटेंच्या पाठपुराव्याला यश आले असून तालुक्यातील 21 तर टाकेद गटातील 14 गावांना सौर पथदीप व हायमास्टसाठी मंजुरी मिळाली आहे.

यात टाकेद गटातील अडसरे बु॥, आधारवाडी, आंबेवाडी, बेलगाव-तर्‍हाळे, धामणगाव, धामणी, गंभीरवाडी, इंदोरे, खडकेद, निनावी, सोनोशी, टाकेद बु॥, वासाळी, मांजरगाव या गावांना प्रत्येकी 3 लाख 2 हजारप्रमाणे 42 लाख 28 हजार

तर सिन्नर तालुक्यातील देवपूर, धारणगाव, घोटेवाडी, हरसुले, हिवरे, कोनांबे, मिरगाव, मीठसागरे, नायगाव, पंचाळे, पांगरी बु॥, पाथरे बु॥, पिंपळे, रामपूर, सायाळे, शहा, शिवडे, सोमठाणे, वडांगळी, विंचूरदळवी, वावी या गावांसाठी प्रत्येकी 2 लाख 88 हजारप्रमाणे 60 लाख 48 हजार निधी मंजूर झाला आहे. या सौरपथदीप व हायमास्टमुळे 35 गावे उजळणार असल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या