Friday, May 3, 2024
Homeनाशिककंटेन्मेंटझोन निर्बंधाची कडक अंमलबजावणी

कंटेन्मेंटझोन निर्बंधाची कडक अंमलबजावणी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने पॉझिटिव्ह रुग्णांच्या परिसरात कंटेन्मेंटझोनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात सोमवारी (दि. 22) झालेल्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. मांढरे म्हणाले, करोनाचा वाढता प्रसार रोखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे.

त्यामुळे ज्या ठिकाणी कंटेन्मेंटझोन जाहीर केला जाईल तेथील लोकांनी करोनाच्या सर्व मागदर्शक सूचनेच्या पालन करणे आवश्यक आहे. कंटेनमेंटझोनच्या अंमलबजावणीसाठी गेल्यावेळी प्रमाणे पोलीस अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच या परिसराचे मॅपिंग व बारकोडींग करण्यात येईल.

ग्रामीण भागातील करोना नियंत्रणात आणण्यासाठी मुख्याधिकारी यांची सेवा घेण्यात येवून त्यांना टेस्टींग व ट्रॅकिंगचा दैनंदिन अहवाल त्यांनी सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या.

यावेळी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस उपायुक्त बारकुंड, अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, महापालिकेचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.बापूसाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक श्रीनिवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार उपस्थित होते.

ग्रामीण भागातील दौरे करणार

ग्रामीण भागात ज्या ठिकाणी करोना रुग्णांची संख्या अधिक आहे, अशा तालुक्यात दौरे करुन आवश्यक आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात येईल. तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध मोहिम, बाधित क्षेत्रातील ग्रामीण पोलीस पथकाच्या कार्यवाही बाबत माहिती घेण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या