Wednesday, May 8, 2024
Homeदेश विदेशलवकरात लवकर उरकून घ्या बँकेची कामं!

लवकरात लवकर उरकून घ्या बँकेची कामं!

मुंबई | Mumbai

जर तुम्हाला बँकेशी संबंधित काही कामे करायची असतील तर ती याच आठवड्यात करावीच लागतील.

- Advertisement -

या कालावधीत तुम्ही बँकेची कामे करुन घेतली नाहीत तर तुम्हाला एक आठवडा थांबावे लागले. आर्थिक वर्षाच्या महिन्यातील हा शेवटचा आठवडा असून या आठवड्यात आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अनेक बँकांना सुट्ट्या आहेत.

आर्थिक वर्षाचा अखेर असल्याने बँकांसाठी मार्च महिना महत्वाचा असतो. पण मार्चअखेरीस होळी, शनिवार, रविवार आणि बँकांच्या वर्षाचा आर्थिक हिशेब करण्यास बँका बंद राहणार आहेत. चालू महिन्यातील बँकांच्या महत्त्वाच्या कामांचे नियोजन नागरिकांना २६ मार्च आधी उरकावे लागणार आहे.

यामध्ये २७ मार्चला दुसरा शनिवार, २८ मार्चला रविवार, २९ मार्चला धूलिवंदन सण, ३० मार्चला मार्च अखेरचा दिवस तर ३१ मार्चला सार्वजनिक व्यवहार बंद असल्याने बँका बंद राहणार आहेत.

तर १ एप्रिलला अकाउंट क्लोजिंगचा दिवस, २ एप्रिल दिवशी गुड फ्रायड तर ४ एप्रिलला रविवार असल्याने सरकारी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग कॅलेंडरनुसार २७ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान केवळ दोनच दिवस बँकांचे कामकाज राहणार आहे.

त्यामुळे या दोन दिवसांमध्ये बँक सुरु असतानीही ग्राहकांची बँकेची महत्त्वाची कामे शिल्लक राहिल्यास ती करण्यासाठी ५ एप्रिलची वाट पहावी लागणार आहे.

दरम्यान, नुकतच १५ ते १६ सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी बँकांच्या खाजगीकरणविरुद्ध पुकारलेल्या संप आणि सुट्ट्यांमुळे बांका सलग चार दिवस बंद असल्याने ग्राहकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. आता सलग सुट्ट्यांमुळे बँकांचे कामकाज पुन्हा ठप्प होणार आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सुरक्षित सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून आपली बँकेची कामे करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

तसेच येत्या एप्रिलमध्ये बँकांचे कामकाज फक्त १७ दिवस चालणार आहे. बँकांना सर्व राज्यात १३ दिवस सुट्टी असेल असे नाही. तेलुगु नववर्ष, गुढीपाडवा, वैशाख, बिजू फेस्टिव्हल आणि उगाडी निमित्त एप्रिलमध्ये बँकांना १३ एप्रिल रोजी सुट्टी राहणार आहे.

१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने सुट्टी असेल. त्यानंतर काही राज्यांमध्ये हिमाचल डे, विशु, बंगाली न्यू ईयर, सरहुल यानिमित्ताने १५ एप्रिल रोजी सुट्टी असेल.

तर २१ एप्रिल रोजी रामनवमी आणि २५ एप्रिल रोजी महावीर जयंती निमित्त बँकांना सुट्टी असेल. तसेच सर्व बँकांना १० आणि २४ एप्रिल रोजी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल. तर ४, ११ आणि १८ एप्रिल रोजी रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या