Friday, May 3, 2024
Homeधुळेव्यापाऱ्यासह तरूणाला मारहाण करून लुटले

व्यापाऱ्यासह तरूणाला मारहाण करून लुटले

धुळे । प्रतिनिधी Dhule

तालु्क्यातील खेडेसह वार कुंडाणे शिवारात दोन वेगवेगळ्या घटनेत व्यापार्‍यासह तरूणाला बेदम मारहाण करून लुटण्यात आले. दोन्ही घटना शनिवारी रात्री घडल्या. याप्रकरणी तालुका पोलिसात दोन गुन्ह्यात तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तालु्नयातील खेड शिवारात दुचाकीवरून जाणार्‍या व्यापार्‍याला तिघांनी मारहाण करून लुटल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी तीन अज्ञात इसमांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. व्यापारी नरेश उर्फ साई साधुराम माटा (वय 55 रा. ब्लॉक नंबर ओ-5, रूम नंबर 10, कुमारनगर, साक्री रोड, धुळे) हे दि. 27 मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या दुचाकीनेे जात होते. त्यादरम्यान खेड शिवारातील हॉटेल साई भगवानजवळ त्यांना दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी अडविले. त्यांना हाताबु्नयांनी मारहाण करून जखमी केले.

त्यांच्या पॅन्टच्या खिशातील 1 हजार 500 रूपये रोख, 5 हजारांचा मोबाईल, 2 हजार 700 रूपयांचा किराणा माल असा 9 हजार 200 रूपयांचा मुद्येमाल व दुचाकीची चावी जबरीने घेवून गेले. घटनेनंतर नरेश माटा यांनी तालुका पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. त्यानुसार तीन अज्ञात इसमांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एएसआय पी.एन.चव्हाण करीत आहेत.

तरूणाला लुटले- धुळे तालु्नयातील वार कुंडाणे शिवारात तरूणाला बेदम मारहाण करून चाकुने वार करत जखमी केले. त्याच्याकडील रोख 7 हजार 750 रूपये व मोबाईल, असा 17 हजारांचा मुद्येमाल लुटून नेला.

याप्रकरणी तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वप्निल अशोक यादबोले (वय 21 रा. गोळीबार टेकडी जवळ, धुळे) याने तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याला दि. 27 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वार कुंडाणे शिवाराती इच्छापुर्ती गणपती मंदिरासमोर तीन अनोळखी इसमांनी अडविले. त्याला हाताबु्नयांनी बेदम मारहाण केली. तसेच चाकुने डो्नयावर वार करून जखमी केले. पॅन्टच्या खिशातील रोख 7 हजार 750 रूपये, 10 हजारांचा मोबाईल व कागदपत्रांची बॅग असा मुद्येमाल जबरीने लुटून नेला. त्यावरून तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय रूपेश काळे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या