Monday, May 6, 2024
Homeजळगावमहिला रुग्णालयात 100 खाटांची व्यवस्था

महिला रुग्णालयात 100 खाटांची व्यवस्था

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यात करोना बाधितांची वाढती संख्या आणि बेडची कमतरता लक्षात घेता, मोहाडी रोडवरील महिला रुग्णालयात 100 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

येत्या 5 एप्रिलपासून आरोग्य सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दिली. यावेळी त्यांनी नवीन महिला रुग्णालयाची पाहणी केली.

जळगाव जिल्ह्यात स्वतंत्र महिला रुग्णालयासाठी 2016-17 मध्ये मंजूरी मिळाली होती. त्यानुसार काम पुर्णत्वास आले आहे.

75 कोटी निधीतून हे काम झाले असून, करोनाचा प्रादुर्भाव आणि बेडची कमरता लक्षात घेवून हे रुग्णालय 5 एप्रिल पासून सुरु करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर जयश्री महाजन यांनी पाहणी केली.

भविष्यात 800 रुग्णांची व्यवस्था

सद्यास्थितीला 100 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. भविष्यात याठिकाणी 800 रुग्णांची व्यवस्था होईल अशी व्यवस्था केली जाणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

लसीकरणाबाबत केंद्राने महाराष्ट्राकडे लक्ष द्यावे

अन्य राज्यांमध्ये घरोघरी जावून लसीकरण केले जात आहे. त्याच पध्दतीने महाराष्ट्रातही घरोघरी जावून लसीकरण करण्याबाबत परवानगी देण्यात यावी. कारण, महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव देशात सर्वात जास्त आहे. त्यामुळे खास बाब म्हणून केंद्राने राज्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

ऑक्सिजन बेडसाठी तीन कोटींचा निधी

ऑक्सिजन बेडचा तुटवडा लक्षात घेता, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी डीपीडीसीतून तीन कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार प्राथमिक कारोग्य केंद्रांसह उपकेंद्रांमध्येही ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध होईल. जेणेकरुन सद्यास्थितीत शहरावर येणारा ताण कमी होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या