Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याउद्योगक्षेत्रात लॉकडाऊन नको; उद्योजकांचे मत

उद्योगक्षेत्रात लॉकडाऊन नको; उद्योजकांचे मत

सातपूर । प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्रात लॉकडाऊन नको, अशी प्रतिक्रिया बहुतांश उद्योजकांनी व्यक्त केली आहे. याबाबत उद्योजकांनी ‘दै. देशदूत’शी बोलताना व्यक्त केलेल्या भावना.

- Advertisement -

लॉकडाऊन हा पर्याय नसावा

समाजात मोठ्या प्रमाणात बेफिकीरी दिसून येते. लोक बेजबादारीने वागताना दिसून येतात. त्याचा फटका उद्योगांना बसू नये. उद्योगांमध्ये मागिल एप्रिलमध्ये दिलेल्या शिस्तीच्या प्रक्रिया आजही काटेकोरपणे पाळल्या जात आहेत. ज्या उद्योगांमध्ये त्याचा अभाव असेल त्यांना शासन करणे योग्य आहे. मात्र सरसकट उद्योगक्षेत्राला लॉकडाउनमध्ये ढकलू नये. गर्दीच्या ठिकाणांवर शिस्त पाळण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.

निखील पांचाळ, उद्योजक

लॉकडाऊन नको, गर्दी आवरा

उद्योग क्षेत्रात कामगार कामावर आल्यानंतर त्यांचे सोशल डिस्टन्सिंग पाळलेच जाते. उद्योग क्षेत्रात आधिच मनूष्यबळ कमी करण्यात आलेले आहे. उद्योग क्षेत्रात पॉझिटव्ह रुग्ण सापडत आहेत. मात्र ते नागरी वसाहतींतून बाधित होत आहेत. त्यामुळे खरा प्रादूर्भाव हा इतर ठिकाणच्या वाढत्या गर्दीमुळे होतो. त्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. देवस्थाने, सण उत्सवांवर बंद करण्यात आलेली आहे. लोकांनी नमाजही घरातच अदा केलेला आहे. शासनाने लग्न, दहावे, बारावे यांच्यावरही बंधने घातलेली आहे.त्यामुळे येत्या काही दिवसात सकारात्मक चित्र समोर येईल मात्र उद्योग क्षेत्र हा सर्व सामान्यांची अर्थ वाहीनी असल्याने त्या भागावर लॉकडाउन हा पर्याय ंठरू शकत नाही.

मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष, निमा

उद्योगांवर विपरित परिणाम होईल

ज्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. ते पहाता शासनाकडून कठोर पावले उचलली जाणार अशी संभावना आहे. आयटी उद्योगांचा विचार केल्यास बर्‍यापैकी उद्योगात वर्क फ्रॉम होम कल्चर आलेले आहे. तसेही कंपनीत 10 टक्के लोकच येत असतात. मात्र लॉक डाउनचा खरा परिणाम हा उद्योगांवर होणार आहे. त्यामुळेबाहेरुन येणार्‍या ग्राहकांवर त्याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. उद्योग व्यवसायावर त्याचा परीणाम ठेवू नये सूरक्षित अंतर पाळले जाते. ते कसोसिने पाळण्यावर बंधने घालता येतील. अन्यथा पून्हा उद्योगांची गाडी रुळावरून घसरेल.बाहेरच्या गर्दीवर आळा घालण्यासाठी प्रबोधन करुन कडक अमलबजावणी करावी मात्र उद्योगांचा समावेश करु नये.

अरविंद माहापात्रा, अध्यक्ष, आयटी असोसिएशन

शासनाने परिसरातील गर्दी करणार्‍या लोकांवर लक्ष केंद्रीत करुन त्यांना पायबंद घालावा. लग्न समारंभांवर अगोदरच बंदी केलेली आहे. गर्दीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त वाढवल्यास आजारावर नियंत्रण मिळवता येईल. त्यासाठी उद्योगक्षेत्रात लॉकडाऊन करण्याची गरज नाही. अन्यथा उद्योग पुन्हा वर्षभर मागे जातील. आता मात्र यातून सावरणेही कठीण होईल.

आशिष नहार, सरचिटणिस राष्ट्रीय आइस्क्रिम उत्पादक फेडरेशन

उद्योगक्षेत्रात लॉकडाऊन करणे ही कल्पनाच महाभयंकर ठरणार आहे. मागील काळात उद्योगांनी आपले राखीव निधी वापरले. आता तेही शिल्लक नाही. त्यामुळे उद्याजक विशेषत: छोटा उद्योजक उध्वस्थ होईल. शासनाने कठोर निर्बंध लावावेत. त्याचे अनुकरण केले जाईल. मात्र उद्योग बंद झाल्यास उद्योजकासह कामगारांच्या जिविताचा प्रश्न निर्माण होईल.

वरुण तलवार, अध्यक्ष, आयमा

- Advertisment -

ताज्या बातम्या