Thursday, May 9, 2024
Homeनगरकर्मचार्‍यांनी मुख्यालय न सोडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कर्मचार्‍यांनी मुख्यालय न सोडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

संगमनेर | वार्ताहर

कोणत्याही कर्मचाऱ्याने आपले मुख्यालय न सोडण्याचे आदेश अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यातील कोविड 19 वरती प्रतिबंध व नियंत्रित करण्याच्या दृष्टीने कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपलब्धता आवश्यक असणार आहेत. त्या दृष्टीने सध्या कोणत्याही कर्मचाऱ्याने आपले मुख्यालय न सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सध्या कोविड-19 या विषाणू चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील टॉप टेन जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा समावेश झाला आहे.

ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी कोणत्याही परिस्थितीत आपले मुख्यालय सोडू नये. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज भासू शकते ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी लक्षात घेऊन सदरचे आदेश दिले आहेत.

संबंधित अधिकाऱ्यांना रजेवर जायचे असल्यास जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात प्रशासन नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या