Friday, May 3, 2024
Homeनाशिकरेमडिसीवीर आणि ऑक्सिजन पुरवठ्याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस आक्रमक

रेमडिसीवीर आणि ऑक्सिजन पुरवठ्याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस आक्रमक

इंदिरानगर l Indira nagar (वार्ताहर) :

नाशिक शहरासह जिल्ह्यात रेमेडिसीवर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना शहरातील अनेक मेडिकल चालकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे रेमडिसीवीर आणि ऑक्सिजन पुरवठा याबाबत प्रचंड संघर्ष होताना दिसत आहे.

- Advertisement -

यासंदर्भात योग्य ते नियोजन प्रशासनाने तात्काळ करावे याआशयाचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे प्रदेश सरचिटणीस अमोल पाटील यांच्या नेतृत्वात राज्याच्या अन्न व औषध प्रशासन मुख्यालयाचे सह आयुक्त समाधान पवार व नाशिक प्रशासकीय विभागाचे सह आयुक्त दुष्यंत भामरे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, रेमडेसिवीर हे इंजेक्शन बंगलोर आणि हैदराबाद शहरांमधून नाशिक पर्यंत येते. यात किमान 03 दिवस लागत आहेत. त्यासाठी पर्यायी वाहतूक मार्गाचा अवलंब करावा. त्याचप्रमाणे सदर इंजेक्शन चे कमीत कमी 15,000 डोस उपलब्ध होतील असे नियोजन करण्यात यावे. या रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठ्याचे जिल्हास्तरावर विकेंद्रीकरण करण्यात यावे. जेणेकरून सर्वांपर्यंत औषध पोहोचण्यास सुसूत्रता येईल.

सदर औषधाचा येणारा स्टॉक आणि त्याचे वितरण व्यवस्था याची माहिती योग्य पद्धतीने जाहीर करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन सिलिंडर मिळणे अवघड झाले आहे.

यासाठी प्रशासनामार्फत अतिरिक्त 20 टन क्षमतेचा ऑक्सिजन टँकर लवकरात लवकर मागविण्यात यावा. जेणेकरून आगामी काळात आणखी जास्त क्षमतेने ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेन.

आणि या सर्व गोष्टी शासनाने ठरवून दिलेल्या किमतीतच सामान्य नागरिकांना मिळेल याची तजवीज अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात यावी. या सर्व गोष्टींचा शासनदरबारी तात्काळ विचार करण्यात यावा आणि त्वरित समाधानकारक तोडगा काढण्याचा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी घेतला.

त्यावर सहआयुक्तांनी आपल्या विभागाच्या अधिकार्‍यांसोबत महत्वाची बैठक घेतली आणि कामांचे वाटप करून दिले. व राज्यात उद्योगांसाठी ऑक्सिजन निर्मिती थांबवून ती वैद्यकीय गरजेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल पाटील, मुकेश शेवाळे, रमीझ पठाण आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या