Friday, May 3, 2024
Homeजळगावविशेष सहायक सरकारी वकील एसीबीच्या जाळ्यात

विशेष सहायक सरकारी वकील एसीबीच्या जाळ्यात

जळगाव – Jalgaon

वरणगाव पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्यात आरोपींना जामीनास विरोध करावा व तो मिळू नये याकरता…

- Advertisement -

सरकार तर्फे बाजू मांडण्यासाठी पाच हजारांची लाच स्विकारणार्‍या भुसावळ न्यायालयातील विशेष सहाय्यक सरकारी ॲड. राजेश साहेबराव गवई, (वय ५०) यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले.

जळगाव शहरातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर ही पथकाने ही कारवाई केली. पोलिस निरिक्षक प्रशांत सपकाळे, उज्ज्वलकुमार व्ही पाटील, पोलीस नाईक प्रकाश महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या