Monday, May 6, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादेत चार जम्बो फॅसिलिटी कोविड सेंटर उभारण्याची तयारी

औरंगाबादेत चार जम्बो फॅसिलिटी कोविड सेंटर उभारण्याची तयारी

औरंगाबाद – Aurangabad

मार्च महिन्यापासून शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. शहरात रोजचे हजारपेक्षा अधिक रूग्ण निघत असल्याने त्याप्रमाणात उपलब्ध आरोग्य सेवा कमी पडत आहे. बेड्सचा मोठा गंभीर प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. त्यामुळे आता महापालिकेने शहरात आणखी चार ठिकाणी जम्बो फॅसिलिटी कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सोबत 31 मंगल कार्यालयांतही कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहेत.

- Advertisement -

शहरात वाढल्या रूग्णसंख्येमुळे सर्वांना आरोग्य सेवा पुरवण्याचा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. अनेक रूग्णांना बेड्स उपलब्ध होत नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे. आजघडीला औरंगाबाद शहरात 10 हजार 890 सक्रीय कोरोना रूग्ण असून त्यापैकी बेड्सअभावी तब्बल 4 हजार 156 कोरोना रूग्णांना घरीच होम आयसोलेशनमध्ये उपचार दिले जात आहे. आगामी काळात कोरोना संसर्गाचा आणखी उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शहरातील परिस्थिती पाहता आणखी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पालिकेच्या वतीने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी शहरात आणखी चार ठिकाणी सर्व सुविधायुक्त जम्बो कोविड केअर सेंटर लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शुक्रवारी त्यांनी विभागीय क्रीडा संकुल येथील 3 हॉस्टेल, दर्गा रोड येथील श्रीहरी पॅव्हेलीयन, कलाग्राम समोरील मराठवाडा रियल टर्स प्रा.ली व आयडिया कॉल सेंटर येथे पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत शहर अभियंता एस.डी. पानझडे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी चारही ठिकाणी अद्ययावत सुविधा देऊन कोविंड केअर सेंटरची निर्मिती करण्याचे आयुक्त पांडेय यांनी जाहीर केले.

औरंगाबाद शहरातील सर्व कोरोना रुग्णांना उपचार मिळावे व आवश्यक त्या रुग्णांना कोविंड केअर सेंटर येथे भरती करून घेणे आवश्यक आहे. यासाठीच शहरांमध्ये अनेक मंगल कार्यालय देखील ताब्यात घेण्यात येत आहे. त्याची प्रक्रियाही आता पालिकेने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात 31 मंगल कार्यालये ताब्यात घेतली जाणार आहे. तर आवश्यक साहित्य खरेदीही सुरू केली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

देवगिरी मुलींचे वसतीगृह, विभागीय क्रिडा संकुल, शासकीय डीएड कॉलेजमधील मुले, मुलींचे वसतीगृह, इन्स्ट्यूट ऑफ सायन्सची इमारत, संत तुकाराम मुलींचे वसतीगृह, श्रेयश इंजिनिअरिंग कॉलेज या 31 मंगल कार्यालये यात कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहे. यासाठी पालिकेला डॉक्टर्स, नर्ससह तब्बल चार हजार कर्मचार्‍यांची गरज भासणार आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच पालिकेने आयुषचे 125 डॉक्टर्स भरती केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या