Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिक ऑक्सिजन लिकेज : माझी आई तडफडून, तडफडून मेली

नाशिक ऑक्सिजन लिकेज : माझी आई तडफडून, तडफडून मेली

नाशिकमध्ये महानगर पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने सर्वत्र हाहाकर माजला आहे. दुरुस्तीच्या कामांमुळे अर्धा तास रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. याच अर्ध्या तासात तब्बल २२ जणांचा जीव एका झटक्यात गेला. यापैकी काही अनेक रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत होते. तर काही रुग्णांमध्ये सुधारणा होत होत्या. काहींनी आपल्या नातेवाइकाला घरी घेऊन जाण्याची तयारी देखील केली होती. पण, अर्ध्या तासाने होत्याचे नव्हते केले. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांच्या आक्रोश अंगावर शहारे आणणारा होता.

नाशिक ऑक्सिजन लिकेज : २२ जणांचा मृत्यू, संख्येत वाढ होण्याची भीती

- Advertisement -

एका रुग्णाच्या मुलीने माध्यमांशी बोलतांना म्हटले, ‘माझी आई तडफडून, तडफडून मेली. जेव्हा आम्ही तिला इथे घेऊन आलो तर दोन दिवस तिला वेटिंगवर ठेवले होते. हे काय हॉटेल आहे का? रजिस्ट्रेशननंतर तिला दोन दिवसांनी दाखल करुन घेतले. आता माझ्या मम्मीला थोडे बरे वाटू लागले होते. जेवण देखील करु लागली होती. पण फक्त अर्धा तास ऑक्सिजन बंद झाला आणि कोबंडीप्रमाणे तडफडून मेली. ती मला सांगत होती. मला वाचवा… पण आमच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. फक्त माझी मम्मीच नाही तर वॉर्डमध्ये जेवढे पेशंट होते तेवढे सगळे मेले. काय नाही करु शकले हे लोके.’ अशी संतप्त प्रतिक्रिया मृत रुग्णाच्या मुलीने दिली. तिचा आक्रोश मन सुन्न करणारा होता.

दुसरा रुग्णाचा नातेवाईक सांगितले, ‘माझ्या भावाची प्रकृती चांगली झाली होती. ९८ लेव्हल होती माझ्या भावाची. ही मानवी चूक आहे. पण मिनिटात खेळ संपला. संपुर्ण हॉलमध्ये आवाज व किंचाळ्या सुरु होत्या. कोणी ऑक्सिजन देण्यास तयार नव्हते. सिलेंडर संपले म्हणत होते. सर्व रिकव्हर होणारे रुग्ण होते. पण गेले. ’

- Advertisment -

ताज्या बातम्या