Monday, May 6, 2024
Homeनगरसाईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चक्क हरीण, काळवीट दाखल

साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चक्क हरीण, काळवीट दाखल

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरातील श्री साईबाबा संस्थानच्या सुपर हॉस्पिटल परिसरात सोमवार रोजी दुपारच्या वेळी एक हरीण/ काळवीट चक्क दाखल झाल्यामुळे काही वेळस उपस्थित असलेल्या रुग्णांनाही कुतुहल वाटत होते.

- Advertisement -

कायम उपचारासाठी रुग्ण येत असताना च हरीणच दवाखान्यात सैरभैर फिरताना बघितल्यावर यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत होते. हे हरीण पाण्याच्या अन्नाच्या शोधात हॉस्पिटल परिसरात आले असावे, असेच दिसून येत होते. मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या उष्णतेमुळे पाण्याच्या व अन्नाच्या शोधात हे वन्य प्राणी शहराकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे.

शिर्डी लगतच्या पिंपळवाडी, नपावाडी, रुई आणि शिंगवे या परिसरात मोठ्या प्रमाणावर मोर आणि हरीण/काळवीट यांसारखे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत. वनखात्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणवठे तयार करण्याची गरज असताना त्याकडे फारसे गंभीरपणे न बघितल्यामुळे हे वन्य प्राणी आता शहराकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे.

लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात शांतता आहे. त्यामुळे फिरत हे हरीण थेट शिर्डी शहरात हॉस्पिटलच्या परिसरात आले असावे असे म्हणावे लागेल. शिर्डी शहरातील श्री साईबाबा संस्थानच्या सुपर हॉस्पिटल परिसरात सोमवार रोजी दुपारच्यावेळी एक हरीण/ काळवीट चक्क दाखल झाल्यामुळे काही वेळस उपस्थित असलेल्या रुग्णांनाही कुतुहल वाटत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या