Friday, May 3, 2024
Homeजळगावजळगाव पीपल्स बँकेच्या चेअरमनपदी अनिकेत पाटील

जळगाव पीपल्स बँकेच्या चेअरमनपदी अनिकेत पाटील

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

दि जळगाव पीपल्स कोऑप बँकेची संचालक मंडळ सदस्यांची 2021-2026 या कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक एन.डी.करे सांगली यांचेकडून राबविण्यात आली.

- Advertisement -

आज 30 एप्रिल रोजी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी संचालक मंडळाची पहिली सभा बोलाविली होती. त्यामध्ये बँकेचे चेअरमनपदी अनिकेत भालचंद्र पाटील तर व्हाइस चेअरमनपदी डॉ. प्रकाश मांगीलाल कोठारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

भालचंद्र पाटील यांनी सलग 15 वर्ष सर्वाधिक काळ बँकचे चेअरमन पद भूषविले आहे. दि मल्टिस्टेट को-ऑप सोसायटीज ऑक्ट 2002 नुसार दोन कालावधीपेक्षा जास्त चेअरमनपदी राहू शकत नसल्याने बँकेच्या संचालक मंडळाने बँकेच्या नेतृत्वाचे सूत्र सर्वानुमते अनिकेत भालचंद्र पाटील यांचेकडे सोपविले आहे. डॉ.प्रकाश कोठारी यांची व्हा.चेअरमन म्हणून निवड झाली आहे. ते चार्टर्ड अकाउंटंट असून वित्त क्षेत्रातील अनुभवी व निष्णात व्यक्तीमत्व आहे.

असे आहेत संचालक मंडळ

पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत भालचंद्र पाटील,व्हाइस चेअरमन डॉ.प्रकाश मांगीलाल कोठारी, संचालक भालचंद्र प्रभाकर पाटील,चंद्रकांत बळीराम चौधरी, सुनिल प्रभाकर पाटील,विलास चुडामण बोरोले, स्मिता प्रकाश पाटील, सुरेखा विलास चौधरी, चंदन सुधाकर अत्तरदे, सुहास बाबुराव महाजन, राजेश धीरजलाल परमार, रामेश्वर आनंदराम जाखेटे, प्रवीण वासुदेव खडके, ज्ञानेश्वर एकनाथ मोराणकर यांचा समावेश आहे. नूतन चेअरमन, व्हा.चेअरमन आणि संचालक मंडळाचा यावेळी सत्कार करण्यात आला.

प्रथमच लाभले तरुण नेतृत्व

अनिकेत पाटील हे बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील यांचे सुपुत्र आहेत. तसेच ते केमिकल इंजिनिअर असून व्हेगा केमिकल्स प्रा.लि.चे संचालक म्हणून देखील काम बघतात. बँकेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात कमी वयात चेअरमनपदी विराजमान झालेले अनिकेत पाटील हे प्रथम संचालक आहेत. त्यांच्या रुपाने जळगाव पीपल्स बँकेस तरुण नेतृत्व लाभले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या