Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयपश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराचा चाळीसगावातून निषेध

पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराचा चाळीसगावातून निषेध

चाळीसगाव – chalisgaon – प्रतिनिधी :

पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे.

- Advertisement -

ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल कॉंग्रेस तर्फे हल्ले करण्यात येत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहे.

ही लोकशाहीची हत्या असल्याने त्याच्या निषेधार्थ चाळीसगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसीलदार अमोल मोरे निवेदन देण्यात आले आहे.

याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के.बी.साळुंखे, जिल्हा चीटणीस प्रशांत पालवे, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम व पंचायत समितीचे गटनेते संजय भास्कर पाटील आदि उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या