Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रराज्य सरकारला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने 'ही' याचिका फेटाळली

राज्य सरकारला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने ‘ही’ याचिका फेटाळली

मुंबई | Mumbai

- Advertisement -

केंद्र आणि राज्य सरकारने (Central and State Government) घेतलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या (Change of Name) निर्णयाला काही स्थानिकांनी विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने स्थानिकांची ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) असे नामांतर करण्याची मागणी काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाली होती. पंरतु, या नामांतराला काही स्थानिकांनी विरोध दर्शवत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये या निर्णयावर सुनावणी (Hearing) होऊन न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता. यानंतर आज न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय जाहीर करत स्थानिकांच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या.

दरम्यान, यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारने शहरांच्या नामांतराबाबत घेतलेला निर्णय महसूल विभागाकरीता (Revenue Department) असल्याने यामुळे कोणाचे कुठलेही नुकसान होणार नाही, असे म्हटले. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघटनात्मक विस्तारावर भर; २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यस्तरीय चिंतन शिबिर

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार)संघटनात्मक विस्तारासाठी व्यापक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सध्या पक्षाकडे लोकसभेतील १ खासदार आणि विधानसभेतील ४१ आमदार...