Monday, May 6, 2024
Homeनाशिकनियमांचे उल्लंघन : 3 लाख 92 हजारांचा दंड

नियमांचे उल्लंघन : 3 लाख 92 हजारांचा दंड

नाशिक । प्रतिनिधी

शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता उल्लंघन करणार्‍यांकडून मनपा व पोलीस प्रशासनाने 3 लाख 72 हजारांचा दंड वसूल केला.

- Advertisement -

महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच पोलीस प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, सार्वजनिक जागेवर थुंकणे याबाबत दंडात्मक कारवाई केली. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी बाहेर फिरताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्यापासून दुसर्‍याला त्रास होऊ नये व दुसर्‍यांचाही आपल्याला त्रास होऊ नये यासाठी मास्कचा वापर करणे आवश्यक असून रस्त्यावर कुठेही थुंकू नये, वेळोवेळी सॅनिटायझर तसेच साबण लावून हात स्वच्छ करणे या नियमांचे पालनही अनेक नागरिकांकडून करण्यात येत नाही.

कडक लॉकडाऊनमध्येही नागरिकांमध्ये बेफिकिरी दिसत आहे. ही बाब लक्षात घेता महापालिका व पोलीस प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी कारवाई केली. सिडको विभागात चार केसेसमधून दोन हजार रुपये, नाशिक पूर्व विभागात सात जणांना 3 हजार 500 रुपयांचा दंड करण्यात आला. नाशिक पश्चिम विभागात चार जणांकडून दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

सातपूर विभागात सात जणांकडून 3 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यात पोलिसांनीही संपूर्ण शहरात मास्क न वापरणार्‍या 199 जणांकडून 99 हजार 500 रुपये दंड वसूल केला. महापालिकेप्रमाणेच पोलिसांमार्फतही दंडात्मक कारवाई करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे तसेच आस्थापना बंद करण्याचे निर्देश दिले असताना नियमबाह्य पद्धतीने आस्थापना सुरू ठेवल्याप्रकरणी पंचवटी, नाशिक पश्चिम विभागात तीन आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे 15 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलीस विभागाने एकूण 234 आस्थापनांवर कारवाई करून 1 लाख 72 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या