Friday, May 3, 2024
Homeनगरगरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन उपलब्ध

गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन उपलब्ध

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहरातील नगरसेवक श्रीनिवास बिहाणी व सकल दिगंबर जैन समाजाच्या सहकार्याने श्रीरामपूर हेल्पिंग हॅन्डसच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन मोफत देणार असल्याची माहिती मोरया फाऊंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी दिली.

शहरातील काही करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर श्‍वास घेण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यातच ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा असल्याने त्याला उत्तम पर्याय ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचा आहे. ही गरज लक्षात घेता श्रीरामपूर हेल्पिंग हॅन्डस टीमला नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी तीन तर सकल दिगंबर जैन समाजाने दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. डॉक्टरच्या शिफारस पत्रानंतर हे मशीन गरजू रुग्णाला जास्तीत जास्त 10 दिवसांपर्यंत देण्यात येणार असल्याचे खोरे यांनी सांगितले.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील रुग्णांना हेल्पिंग हॅन्डसमार्फत विविध सेवा दिली जात असून करोना विषयी कोणतीही समस्या असल्यास नागरिकांनी सुजित राऊत, कल्याण कुंकूलोळ, जीवन सुरुडे, अ‍ॅड. सौरभ गदिया, साजिद मिर्झा, राहुल सोनवणे, मयूर पांडे, मनोज ओझा, निलेश गोराणे, फिरोज पिंजारी, फिरोज दस्तगिर, स्वप्नील सोनार, संजय वाघस्कर, ऋषीकेश बंड, नजीर पिंजारी, विकी जैन, शुभम बिहाणी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन खोरे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या