Wednesday, May 8, 2024
Homeजळगावगणेशनगरात डेरेदार वृक्षांची कत्तल

गणेशनगरात डेरेदार वृक्षांची कत्तल

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हापेठ गणेश नगर भागातील प्रज्ञा इंग्लिश मिडीयम स्कूलसमोर मनपाची परवानगी न घेता तीन डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मनपा अभियंता योगेश वाणी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.दरम्यान. संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेने केली आहे.

जागतिक जैवविविधता दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस रहिवासी भागात वृक्षतोड सुरू असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे यांना मिळाली. माहिती मिळताच गालफाडे तत्काळ घटनास्थळी पोहोचले.

परंतु इलेक्ट्रॉनिक सॉ वापरून अगदी कमी वेळेत 3 झाडे तोडून वृक्षतोड करणारे पसार झाले. त्यानंतर मनपा अभियंता योगेश वाणी आणि कर्मचारी यांनी पंचनामा केला.

यात संबंधितांनी 2 सप्तपर्णी आणि एक कडुनिंब अशी 3 झाडे विना परवानगी तोडल्याचे निदर्शनास आले आहे.

यावेळी वृक्षांची कत्तल केल्यामुळे तसेच कडुनिंबाच्या झाडावर पक्षांचा अधिवास असल्याने वन्यजीव अधिनियम 1972 मधील तरतुदी नुसार अधिवास नष्ट करणे आणि शिकार कलम अंतर्गत वेगळा गुन्हा दाखल करावा अशी मागणी योगेश गालफाडे यांनी केली आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या