नामपूर । वार्ताहर Nampur
- Advertisement -
भरधाव कारने रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणास धडक दिल्याने तो जागीच गतप्राण झाल्याची घटना सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. नामपूर-सटाणा रोडवरील अजिंक्य मैदानालगत हा अपघात घडला.
नकुल जयवंत दळवी (20) हा तरूण मैदानाजवळून पायी जात असतांना कार (एम.एच.-46-झेड.-8053) ने पाठीमागून धडक दिल्याने नकुल मृत्यूमुखी पडला. या घटनेची फिर्याद जयवंत दळवी यांनी दाखल केल्याने जायखेडा पोलिसांनी याप्रकरणी कारचालक राजेंद्र शंकर पवार (रा. नामपूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा