Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याबैलगाडीला बसची धडक; मायलेकाचा जागीच मृत्यू

बैलगाडीला बसची धडक; मायलेकाचा जागीच मृत्यू

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

पोटाची खळगी भरण्यासाठी निघालेल्या नांदगाव तालुक्यातील ( Nandgaon Taluka ) माणिकपुंज (गणेश नगर) येथील ऊसतोड मजुरांच्या (Sugarcane workers) बैलगाडीला बसने औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावर इसारवाडी फाट्याजवळ जोरदार धडक दिल्याने भीषण अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला तर पती व अन्य एक मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

नांदगाव तालुक्यातील हजारोंच्या संख्येने ऊसतोड मजूर राज्यभरात व इतर राज्यांच्या साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी जात असतात.तालुक्यातील माणिकपुंज (गणेशनगर) येथील गिरे कुटुंबीय ऊसतोडीसाठी बैलगाडीने जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी फाट्याच्याजवळ असलेल्या इंडियन हॉटेलजवळ गंगापूर आगाराच्या बसने (एमएच 14 बीटी 2500) ऊस तोडीला जाणार्‍या बैलगाडीला जोराची धडक दिली.

अपघात एवढा भीषण होता की बैलगाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे. या अपघातात कलाबाई गोविंद गिरे आणि अर्जुन गोविंद गिरे असे मृत आई-मुलाचे नाव आहे. तर पती गोविंद विठ्ठल गिरे, मुलगा बाळू गोविंद गिरे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या