Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात भीषण अपघात; टायर फुटल्याने बस डिव्हायडर तोडून दुचाकींना धडकली

नाशकात भीषण अपघात; टायर फुटल्याने बस डिव्हायडर तोडून दुचाकींना धडकली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकहून नाशिककडे येणाऱ्या खासगी बसचे टायर फुटल्याने बस डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेन मध्ये घुसून दोन दुचाकींना धडकली. त्यांनतर बस झाडावर जाऊन आदळली….

- Advertisement -

या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील बेळगाव ढगा (Belgaon Dhaga) परिसरात हा अपघात झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खासगी वाहतूक करणारी बस त्र्यंबकेश्वरहुन देवदर्शन करून नाशिककडे निघाली. बस बेळगाव ढगा फाट्याजवळील एस्पालिअर स्कुलजवळ आली असता बसचे अचानक टायर फुटले.

आजचे दिनविशेष (दि. ११ मार्च २०२३)

त्यानंतर बस डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये गेली. यावेळी नाशिकहून त्र्यंबककडे जाणाऱ्या दोन दुचाकींना बसने जोरदार धडक दिली व बस झाडावर आदळली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कालव्यात पडलेल्या ‘त्या’ जवानाचा मृत्यू; 20 तासांनंतर सापडला मृतदेह

या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या