Saturday, May 18, 2024
Homeनाशिकशेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

शिरवाडे वाकद | प्रतिनिधी | Shirwade Wakad

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Lasalgaon APMC) येथील खानगाव नजीक असणाऱ्या भाजीपाला खरेदी-विक्री केंद्रात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून पैसे न देता तब्बल ४ लाख ७३ हजार ८७३ रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याप्रकरणी लासलगाव बाजार समितीच्या वतीने दोन व्यापाऱ्यांच्या (Traders ) विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात (Lasalgaon Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

- Advertisement -

बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो ‘तो’ व्हिडिओ…; संजय राऊतांचे भाजपला प्रत्युत्तर

याबाबत अधिक माहिती अशी की,व्ही.डी.अॅग्रोतर्फे चालक शुभम विलास देवरे व शिवनेरी व्हेजिटेबलतर्फे ऋषीकेश शिवाजी आमले रा.खडक माळेगाव ता.निफाड यांनी सन २०२१ व २०२२ मध्ये वेळोवेळी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव जवळील खानगावनजीक येथील भाजीपाला खरेदी-विक्री केंद्रावर संगनमताने शेतकऱ्यांचा फळे व भाजीपाला (Vegetables) वेळोवेळी विकत घेऊन त्यांच्या मालाची बाकी रक्कम ४ लाख ७३ हजार ८७३ रुपये वेळोवेळी मागणी करुन सुद्दा न देता शेतकऱ्यांची (Farmers) फसवणूक केली.

सप्तशृंगीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाने घेतला अचानक पेट

तसेच बाजार समितीच्या नियमाप्रमाणे होणारी बाजार फी रक्कम ३७ हजार १६० रुपये ही देखील भरली नाही. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची व बाजार समितीची एकूण ५ लाख ११ हजार ३३ रुपयांची फसवणुक केली म्हणून सचिव नरेंद्र सावळीराम वाढवणे यांच्या फिर्यादीवरून संबंधित व्यापाऱ्यांच्या विरोधात भादवि कलम ४१८,४२०,३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सपोनि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. बाळासाहेब कांदळकर करीत आहेत.

शब्दगंध : अमृतकाळात लोकशाहीची शोभा!

- Advertisment -

ताज्या बातम्या