Tuesday, May 5, 2026
Homeनाशिकसराफ व्यावसायिकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

सराफ व्यावसायिकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

तारण म्हणून ठेवलेले ल्या सात लाख रुपये किंमतीचे दागिने अपहार करून १२ नागरिकांची फसवणूक केल्या प्रकरणी आरटीओ ऑफिस जवळच्या रोहित ज्वेलर्स या सराफ व्यावसायिकावर पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

संशयित ज्ञानेश्वर सुधाकर माळवे (वय – ४३, रोहित ज्वेलर्स, कौशल्य मंगल कार्यालय पाठीमागे, आर टी वो ऑफिस समोर, पेठ रोड) नाव असून त्यांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,पेठ रोडवरील नामको हॉस्पिटल पाठीमागे असलेल्या ओम नगर येथे लता प्रकाश राजपूत या आपल्या कुटुंबा समवेत वास्तव्यास आहे.याच परिसरात रोहित ज्वेलर्स यांचे दुकान होते, जुना सोनार काम करत असे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा रोहित ज्वेलर्स ज्ञानेश्वर माळवे विश्वास संपादित केला होता, त्यांचेकडे परिसरातील नागरिक हे सोने घडविणे, तारण ठेवून कर्ज देण्याचे काम देखील करीत होते.

राजपूत यांना पैशांची अडचण निर्माण झाल्याने १ फेब्रुवारी २०२३ रोजी लता राजपूत व मुलगा सिओम राजपुत (वय २५) या रोहित ज्वेलर्स दुकानात गेले आणि दोन महिने दागिने तारण ठेवले. दोन महिन्यानंतर मूळ रक्कम व व्याज असे एकूण ६३ हजार ६०० रुपये दिले. त्यावर रोहित ज्वेलर्स मालक ज्ञानेश्वर माळवे यांनी सदर दागिने हे बँकेत ठेवले आहे, दोन दिवसात देतो असे सांगितले आणि वेळ काढून घेतला.

वेळोवेळी दुकानात चकरा मारल्या मात्र, तारण ठेवलेले सोने दिले नाही. २२ मे २०२३ रोजी दुकानावर गेले असता ते बंद होते तसेच घर देखील बंद होते, अशा प्रकारे एकूण ११ कुटुंबांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून माळवे कडे सात लाख एक हजार रुपये किमतीचे दागिने तारण ठेवले होते. मात्र, ते दागिने माळवेने परत न देता त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून अपहार केला.

ताज्या बातम्या

अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

0
पुनदखोरे | वार्ताहर कळवण शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून कळवण पोलीस ठाणे हद्दीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर, ओतूर रोड लगत एका अनोळखी...