Friday, September 20, 2024
Homeक्राईमNashik Fraud News : विक्रेत्यास दीड काेटींचा गंडा; संशयितावर फसवणुकीचा गुन्हा

Nashik Fraud News : विक्रेत्यास दीड काेटींचा गंडा; संशयितावर फसवणुकीचा गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

नायलॉन धागा तयार करण्यासाठी लागणारी मशिन्स विक्री करण्याच्या बहाण्याने गुजरातमधील (Gujarat) एकाने शहरातील व्यावसायिकास सुमारे दीड कोटींचा गंडा घातला. पैसे घेतल्यानंतरही व्यावसायिकास मशिन्स दिले नाही. तसेच पैशांचा वापर केला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात (Cyber Police Station) फसवणूकीची (Fraud) फिर्याद दाखल झाली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘त्या’ खून प्रकरणातील मुख्य मारेकऱ्यास अटक

शहरातील एका व्यावसायिकास जुलै महिन्यात गुजरातमधील एकाने गंडा घातला. शहरातील व्यावसायिकाने नायलॉन धागा तयार करण्यासाठी लागणाऱ्या मशिन्शचा ऑनलाइन शोध घेतला. त्यातून मध्यस्थामार्फत व्यावसायिकास गुजरातमधील एचडीएन प्रोसिल प्रा.लि. कंपनीचा मालक संशयित हार्दिक पटेल याच्याशी संपर्क झाला. पटेल याने सांगितल्यानुसार शहरातील व्यावसायिकाने दोन मशिन खरेदी करण्यासाठी कर्ज काढून १ कोटी ४६ लाख ८४ हजार रुपये संशयिताच्या बँक खात्यात जमा केले.

हे देखील वाचा : नाशिकच्या पोलिसांचा गौरव; सात अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपती पदक

मात्र त्यानंतर पटेल याने व्यावसायिकास कोणत्याही प्रकारचे मशिन पाठवले नाही. यामुळे व्यावसायिकाने पटेलसोबत वारंवार संपर्क साधला असता त्याने फोन उचलला नाही. तसेच व्यावसायिकाने टाकलेल्या पैशांमधून सुमारे ४० लाख रुपये स्वत:साठी वापरल्याचेही समोर आले. त्यामुळे व्यावसायिकाने सायबर पोलिसांकडे धाव घेत पटेल विरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी (Police) फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : अद्वय हिरेंना दिलासा; नऊ महिन्यांनी तुरुंगातून सुटका

पैसे गोठवले

व्यावसायिकाने तक्रार दिल्यानंतर सायबरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी तपास सुरु केला. ज्या बँक खात्यात पैसे जमा केले त्याची तपासणी केली असता त्यात १ कोटी ६ लाख रुपये असल्याने बँकेमार्फत हे पैसे खात्यात गोठवले आहेत. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या