Sunday, June 30, 2024
Homeक्राईमNashik Crime News : "विरोधात जबाब दिल्यास ठार मारु"; धमकी देणाऱ्या सराईतांवर...

Nashik Crime News : “विरोधात जबाब दिल्यास ठार मारु”; धमकी देणाऱ्या सराईतांवर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

दिंडोरी रोडवरील (Dindori Road) मार्केटमधील भाजीविक्रेत्या महिलेस जुन्या भांडणाच्या गुन्ह्यात विरोधात जबाब दिल्यास मारून टाकण्याची धमकी देत संशयितांनी तिचा पाठलाग करून कोयत्याने वार केल्याची घटना डिसेंबर २०२३ मध्ये घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने (Court) पंचवटी पोलिसांना (Panchvati Police) सहा संशयितांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘त्या’ घरफोडीतील ३९ लाखांचेच दागिने ‘रिकव्हर’

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप अशोक लाड (३५), धरम भास्कर शिंदे (४०), रमेश पांडुरंग बोडके (४१), सूरज उर्फ सुर्या रमेश बोडके (३०), विनोद रमेश बोडके (२८), धीरज रमेश बोडके (२५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पद्‌मा प्रकाश शिंदे (रा. भराडवाडी, फुलेनगर, पेठरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्या दिंडोरी रोडवरील भाजी मार्केटमध्ये (Vegetable Market) भाजीपाला विक्री करतात. संशयितांशी त्यांचे जुने भांडण आहे. ५ डिसेंबर २०२३ रोजी रात्री आठच्या सुमारास त्या भाजीपाला विक्री केल्यानंतर पायी घराकडे जात होत्या.

हे देखील वाचा : Nashik Crime News : क्रिकेट खेळण्याच्या बॅटने बँक कर्मचाऱ्यावर हल्ला

त्यावेळी संशयितांनी त्यांना अडविले आणि, ‘आपल्या भांडणाच्या गुन्ह्यात आमच्याविरोधात जबाब दिला तर तुझ्यावर बलात्कार करू. तुला मारून टाकू अशी धमकी देऊ लागले.’ त्यामुळे घाबरलेल्या पद्‌मा शिंदे यांनी भयभित होऊन पळ काढला. त्यावेळी संशयित संदीप लाड याने पाठीमागून लोखंडी कोयत्याने मारून दोन वार केले. तसेच संशयित धरम शिंदे याने लोखंडी रॉडने मारहाण केली.तर, संशयित रमेश, सूरज, विनोद आणि धीरज यांनी महिलेला मारहाण केली.

हे देखील वाचा : Nashik News : २५ कोटींचे नाट्यगृह बंद अवस्थेत

दरम्यान, याप्रकरणी पद्‌मा शिंदे यांनी न्यायालयात धाव घेत खटला दाखल केला होता.त्यावर जिल्हा न्यायालयात (District Court) महिलेने धाव घेत खटला दाखल केला होता. या खटल्याचा विचार करीत न्यायालयाने आरोपींविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या