Wednesday, October 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजन्यायदेवतेच्या मूर्तीत बदल; डोळ्यावरची पट्टी काढली, तलवारी ऐवजी आता हातात संविधान

न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल; डोळ्यावरची पट्टी काढली, तलवारी ऐवजी आता हातात संविधान

दिल्ली | वृत्तसंस्था Delhi

- Advertisement -

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या सूचनेवरुन न्यायदेवतेत बदल करण्यात आले आहेत. न्यायदेवतेच्या हातात आधी तलवार होती. पण हे हिंसेचे प्रतीक आहे, असे सीजेआयचे मत आहे त्यामुळे, न्यायालये हिंसाचाराद्वारे न्याय देत नाहीत तर घटनात्मक कायद्यांनुसार न्याय देतात. म्हणून दुसऱ्या हातातील तलवार ऐवजी हातात संविधान देण्यात आले आहे.

भारतीय न्यायव्यवस्थेनेही ब्रिटीशांचा काळ मागे टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने फक्त प्रतीकच बदलले नाही. तर न्यायदेवतेने वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टीही काढून टाकली आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वाचनालयातही असाच पुतळा बसवण्यात आला आहे. आधी न्यायदेवतेची मूर्ती असायची त्याच दोन्ही डोळ्यांवर पट्टी बांधली होती. तसेच, एका हातात तराजू तर दुसऱ्या हातात तलवार होती. जी शिक्षेचे प्रतीक आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा असा विश्वास होता की इंग्रजांचा वारसा सोडून आता पुढे गेले पाहिजे. कायदा कधीच आंधळा नसतो. तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे, असे सरन्यायाधीशांचे मत होते. देवीच्या एका हातात तलवार नसावी, तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा संदेश समाजात जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या सूचनेनुसार न्यायदेवतेची मूर्ती बदलण्यात आली आहे. सर्वप्रथम जजेस लायब्ररीमध्ये मोठा पुतळा बसवण्यात आला आहे. येथे न्यायदेवतेचे डोळे उघडे आहेत आणि पट्टी नाही, तर तिच्या डाव्या हातात तलवारीऐवजी संविधान आहे. उजव्या हाताला पूर्वीप्रमाणेच तराजू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या