Sunday, May 19, 2024
Homeनंदुरबारबापरे ; मध्यप्रदेशातील सहा वर्षीय बालकाला नंदुरबारात विकले

बापरे ; मध्यप्रदेशातील सहा वर्षीय बालकाला नंदुरबारात विकले

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

मध्यप्रदेशातून (mp) सहा वर्षीय बालकाला आणून नंदुरबार (nandurbar) शहरात मेंढपाळाला ५० हजाराला विक्रीकेल्याची धक्कादायक घटना काल शहरात घडली. सदर बालक मेंढया चारत असतांना आढळून आल्याने दोघांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन बालक रविन गुरलाल (गोरेलाल) बारेला (वय अंदाजे ६ वर्षे) रा.खातला फाटा, मध्यप्रदेश या बालकास मारोती याने गुंडा नागो ठेलारी याला वेठबिगारी म्हणून ५० हजार रुपये देवून एका वर्षासाठी मेंढ्या चारण्यासाठी दिले.

गुंडा नागो ठेलारी हा मेंढ्या चारण्यासाठी या बालकाचा वापर करीत असतांना काल दि.४ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील उप प्रादेशीक परिवहन कार्यालयासमोर असलेल्या कोळसा डेपोजवळ आढळून आला.

गुंडा नागो ठेलारी हा सदर बालकाकडुन मेंढ्या चारवित असतांना मिळून आला. म्हणुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण जानकीराम पाटील यांच्या फिर्यादिवरून,

नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मेंढपाळ गुंडा नागो ठेलारी (वय ४५,रा. भोणे ता.जि.नंदुरबार) व मारोती यांच्याविरूध्द भादंवि कलम ३७० (४), ३७४ सह बाल कामगार (प्रतिबंध आणि वियमन) अधिनियम १९८६ चे कलम १३, १४ सह ज्युवेनाईल जस्टीस (बालकांची काळजी आणि संरक्षण) कायदा २०१५ चे कलम ७५, ७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तपास अधिकारी सपोनि नंदा पाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या