नाशिक | प्रतिनिधी | Nashik |
टवाळखोरी, लुटमार आणि मद्यपान, रात्रीच्या वेळी हाणामारी तसेच रॅश ड्रायव्हिंगचे प्रकार वाढल्याने आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनमध्ये (Pari Mandal Two) गुन्हेगारांविरोधात अचनाक कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. धडक मोहिमेत पोलिसांनी १५६ सराईत गुन्हेगार तपासले. तर ७७ टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : मद्य डिलर अटकेत; पोलिसांनी पाठलाग करुन मिळविला ताबा
पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हाणामारीच्या घटनांसह गुन्हेगारीच्या (Crime) घटना वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशान्वये परिमंडळ दोनमध्ये पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. नाशिकरोडसह उपनगर, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्याच्या (Satpur Police Station) हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
हे देखील वाचा : Nashik : जुन्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा खून
यावेळी परिमंडळ दोनमधील रेकॉर्डवरील १५६ गुन्हेगारांची चेकिंग करण्यात आली. यात शंभर गुन्हेगारांची चौकशी करून त्यांच्याकडून चौकशी फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच, नाशिकरोड, देवळाली कॅम्प हद्दीतील तडीपार करण्यात आलेल्यांचीही चेकिंग करण्यात आली. सातपूर हद्दीत मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या चौघांविरोधात कारवाई करण्यात आली. तर, पाथर्डी गावात खुलाल चांडे यास देशी दारुच्या बाटल्यासह ताब्यात घेण्यात आले. तसेच, १३ जणांविरोधात कोटपान्वये कारवाई करून अडीच हजारांचा दंड वसुल करण्यात आला.
हे देखील वाचा : धावत्या रेल्वेतून पडल्याने तरूणाचा मृत्यू
७७ टवाळखोरांविरोधात दंडात्मक कारवाई
पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. तर अशास्वरुपाची कारवाई सातत्याने करण्याची अपेक्षा जागरुक नागरिकांनी केली आहे. दरम्यान, रेकाॅर्डवरील संशयितांच्या घरी जाऊन सध्या ते कार करतात याची माहिती संकलित केली जात आहे. साेबतच तडिपारी संदर्भातही कार्यवाही सुरु आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा