Friday, September 20, 2024
HomeनाशिकNashik News : कसारा घाटातील रेल्वे बोगद्या बाहेर दरड कोसळली

Nashik News : कसारा घाटातील रेल्वे बोगद्या बाहेर दरड कोसळली

मुंबईला जाणारी रेल्वे वाहतुक काही काळ विस्कळीत

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

- Advertisement -

गेल्या २४ तासांपासून इगतपुरी व कसारा घाटात (Igatpuri to Kasara Ghat) मुसळधार पाऊस सुरु असल्याने मध्य रेल्वेच्या इगतपुरी येथील कसारा घाटातील दोन नंबर बोगद्याच्या तोंडावर शनिवार (दि.३) रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास दरड (Crack Collapsed) कोसळल्याची घटना घडली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पंधराशे महिलांना लाखाेंचा गंडा; भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचा उद्याेग

ही दरड कोसळताना ती ओव्हरहेड वायरवर पडल्याने ओव्हरहेड वायर ही क्षतिग्रस्त होऊन तुटली आहे. यामुळे मुंबईला जाणारी अप मार्गाची वाहतूक मिडल लाईनवरून वळवण्यात आल्याने मुंबईला (Mumbai) जाणारी रेल्वे वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. विषेश म्हणजे काही मिनीटांपूर्वीच या रेल्वे लाईनवरून पंचवटी एक्स्प्रेस (Panchvati Express) मुंबईला रवाना झाली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : Nashik Fraud News : शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवत सव्वा काेटी रुपये उकळले

दरम्यान, मध्य रेल्वेचे (Central Railway) कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन दरड हटविण्याचे व ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. यामुळे अपलाईन सुरळीत होण्यासाठी अजून पाच ते सहा तास लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या