Thursday, May 2, 2024
Homeजळगावकोविंड सेंटर परिसरात आगीचा वणवा

कोविंड सेंटर परिसरात आगीचा वणवा

रावेर|प्रतिनिधी Raver

येथील कोविंड सेंटर असलेल्या परिसरात अचानक दुपारी आग लागल्याने खळबळ उडाली,परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले,मात्र आगीने काही क्षणातच रुद्रअवतार धारण केले असल्याने,यासाठी अग्निशामक बंबाशिवाय पर्याय नसल्याने, तातडीने बोलवण्यात आलेल्या फायर ब्रिगेडने आग आटोक्यात आणली.

- Advertisement -

कोविंड सेंटरच्या बाजूला जंगल असल्याने,दुपारी अचानक आग लागली, यातून धूर व आगीचे लोळ उठत असल्याने आगीने काही क्षणातच रुद्रवतार धारण केल्याने,परिसरातील नागरिकांमध्ये घाबराहट पसरली होती.पालिकेच्या अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आगीला आटोक्यात आणण्यात आले.या आगीत कोविंड सेंटर परिसरातील जंगल जाळून खाक झाला आहे.सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या