Thursday, May 2, 2024
Homeनगरदरोड्याच्या तयारीतील पाच जणांची टोळी पकडली

दरोड्याच्या तयारीतील पाच जणांची टोळी पकडली

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

घातक शस्त्राचा वापर करून दरोडा टाकण्यासाठी चाललेल्या पाच जणांच्या टोळीला नगर तालुका पोलिसांनी अटक केली. पोपट रेहमान भोसले (वय- 35), मोहन रेहमान भोसले (वय- 20 दोघे रा. मांडवगण ता. श्रीगोंदा), जितेंद्र भरत भोसले (वय- 40 रा. घोसपूरी ता. नगर), ज्ञानेश्वर मोतिराम चव्हाण (वय- 28), विलास बाळू चव्हाण (वय- 32 रा. येसगाव ता. खुलताबाद जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

- Advertisement -

पोपट भोसले हा त्याच्या साथीदारांंसह बुरुडगाव ते अरणगाव रोडवर कुठेतरी दरोडा टाकण्यासाठी येत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांना मिळाली. निरीक्षक राजपूत यांनी पोलीस उपनिरीक्षक धनंजय जारवाल, पोलीस कर्मचारी आनंथा गायकवाड, संभाजी डेरे, खेडकर, शिंदे, बोराडे यांना सोबत घेऊन अरणगाव ते बुरुडगाव रोडवर तांबे वस्तीजवळ सापळा लावला. दोन दुचाकीवरून पाच जण बुरुडगावकडून अरणगाव कडे चालले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता कोयता, लोखंडे धातूचे चाकू, नायलॉन दोरी, मिरची पुड मिळून आली. पोलिसांनी सर्व साहित्यासह त्यांच्या दुचाकी असा एकुण 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरोधात जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या