धुळे । Dhule। प्रतिनिधी
शेतातून जलपरीसह (mermaids from the field) मोटार सायकल चोरी (Motorcycle theft) करणारी टोळी (Gang) स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेने (local crime investigation branch) गजाआड केली आहे. त्या टोळीकडून एक लाख सहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Seizure of property) करण्यात आला आहे. तीन जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
कापडणे, ता. धुळे येथील शेतकरी सुभाष श्रावण पाटील, साहेबराव राजाराम माळी व विलास आसाराम माळी यांच्या शेतातून दि. 2 जुन रोजी प्रत्येकी आठ हजार रुपये किंमतीच्या तीन एचपीच्या तीन जलपरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याबाबत सोनगीर पोलीस ठाण्यात भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलीस निरिक्षक हेमंत पाटील यांना विकास शाम सोनवणे रा. इंदिरानगर भिलाटी, कापडणे व त्याच्या साथीदाराने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने विकास शाम सोनवणे (वय21) याला गावातून विना क्रमांकाच्या मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने राहूल रोहिदास पांचाळ (वय21), राहूल रामचंद्र भिल (वय19), सुनिल हिंमत मालचे सर्व रा. कापडणे यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली.
तसेच विकास सोनवणे याच्या ताब्यात विना क्रमांकाची मिळून आलेली मोटार सायकल 15 दिवसापुर्वी कापडणे गावातून चोरी केल्याची तसेच कापडणे व सरवड येथून जलपरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 40 हजार रुपये किंमतीची मोटार सायकल, 34 हजार रुपये किंमतीच्या चार जलपरी आणि 42 हजार रुपये किंमतीच्या दोन जलपरी असा एकूण एक लाख सहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पथकाने विकास शाम सोनवणे, राहुल रोहिदास पांचाळ आणि राहुल रामचंद्र भिल यांना अटक केली. तर सुनिल हिंमत मालचे हा फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सदर कारवाई पोलीस निरिक्षक हेमंत पाटील, योगेश राहूल, श्रीकांत पाटील, प्रकाश सोनार, योगेश चव्हाण, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, सागर शिर्के, मयुर पाटील, खुशाल पारधी, गुलाब पाटील यांच्या पथकाने केली.




