Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDeshdoot Panchavati Property Expo : देशदूत 'पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पोला' शानदार सुरुवात

Deshdoot Panchavati Property Expo : देशदूत ‘पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पोला’ शानदार सुरुवात

पहिल्याच दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या ‘देशदूत’ आयोजित तसेच ‘हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि.’ प्रायोजित ‘पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो 2024’ प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

- Advertisement -

नरेडको नाशिकचे संस्थापक सदस्य जयेश ठक्कर, नामको हॉस्पिटल विश्वस्त मंडळाचे सचिव शशिकांत पारख, बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय व्यवस्थापक सी. बी. सिंह,, हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक हर्षल हणमंते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून एक्स्पोचे उदघाटन करण्यात आले. यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरू झाला.

‘देशदूत’च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी प्रास्ताविक केले. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे आयोजन पंचवटी येथील एस. एल. के. प्रॉपर्टीज, राज स्वीट्ससमोर, आरटीओ कॉर्नर, दिंडोरी रोड येथे करण्यात आले आहे. त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि तत्सम असे ३० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. मान्यवरांनी प्रदर्शन आयोजनाबाबत सामान्य नागरिक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात विश्वासार्हतेचा सेतू निर्माण करणाऱ्या ‘देशदूत’ परिवाराचे कौतुक केले. तसेच स्टॉलला भेट देत स्टॉलधारकांशी संवाद साधला.

प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत दि. 17 नोव्हेंबर २०२४ दुपारी 2 ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. गृहस्वप्नपूर्तीसाठी नागरिकांनी भेट द्यावी, देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी बांधकाम व्यावसायिक सुशील बागड, नावाचे राजेश शेळके, दै देशदूतचे जाहिरात व्यवस्थापक मिलिंद वैद्य, कॉर्पोरेट व्यवस्थापक संदीप राऊत उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर भगवंत जाधव, समीर पाराशरे, आनंद कदम, प्रशांत अहिरे, विशाल जमधडे, यांनी परिश्रम घेतले. वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले तर आभार जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी मानले.

‘देशदूत’ प्रॉपर्टी एक्स्पोचे मुख्य प्रायोजक नाशिककरांचे ३७ वर्षांपासून असलेले फॅमिली बिल्डर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. ली. हे आहेत. तसेच फायनान्शिअल पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र आहे. तर पर्यावरणीय पार्टनर पपायाज नर्सरी हे आहेत. 17 नोव्हेंबर पर्यंत दररोज दुपारी 2 ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांना प्रवेश खुला आहे. नागरिकांनी ‘देशदूत’ आयोजित पंचवटी प्रोपर्टी एक्स्पोला अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

‘देशदूत’ने प्रदर्शनाचे आयोजन अतिशय उत्तम प्रकारे केले असून पंचवटी परिसरातील अनेक गृह व व्यावसायिक प्रकल्पांची माहिती याद्वारे ग्राहकांना निश्चितच मिळण्यास मदत होईल. नागरिकांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा.
-हर्षल हणमंते

अनेक बांधकाम व्यावसायिकांना व्यासपीठ मिळाले असून, हक्काचे घर घेणाऱ्या नागरिकांना यानिमित्ताने उत्तमोत्तम आणि बजेटनुसार घर निवडण्याची संधी प्राप्त झाली आहे. ग्राहकांना या प्रदर्शनाचा नक्कीच फायदा होणार आहे. देशदूतच्या माध्यमातून होणारा हा उपक्रम प्रशंसनीय असा आहे.
सी.बी. सिंह

    सद्यस्थितीत बांधकाम व्यवसायाबाबत महत्वपूर्ण माहिती मिळण्यास प्रॉपर्टी एक्स्पोची भूमिका महत्त्वाची आहे. घर व त्यासंबंधीचे पूरक पर्याय या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध असल्याने गृहस्वप्नपूर्तीची प्राथमिकता शक्य झाली आहे. ‘देशदूत’ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
    जयेश ठक्कर

      पंचवटीकडे व्यावसायिक दृष्ट्या सकारात्मक दृष्टीने बांधकाम व्यावसायिक बघत आहेत ही निश्चितच चांगली गोष्ट आहे या एक्स्पोच्या माध्यमातून सर्व स्तरातील ग्राहकांना घर व व्यावसायिक प्रकल्प घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे त्याचा निश्चितच ग्राहकांनी फायदा घ्यावा.
      शशिकांत पारख

        YouTube video player
        - Advertisment -spot_img

        ताज्या बातम्या

        Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

        0
        मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...