Friday, May 3, 2024
Homeजळगावनशिराबाद शिवारातील शेतात आढळली मानवी कवटी

नशिराबाद शिवारातील शेतात आढळली मानवी कवटी

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

शेतात फेरफटका मारीत असलेल्या शेतकर्‍याला (farmer) शेतात (field) माणसाची कवटी व हाडे (Human skull and bones)आढळून (Found out) आल्याची धक्कादायक घटना नशिराबाद शिवारात उघडकीस आली.

- Advertisement -

या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे, त्याठिकाणी मिळून आलेल्या आधारकार्ड व मोबाईलवरुन मयताची ओळख पटली असून रामा उराव (वय-52, रा. मोकार्या जि. लोहरदगा राज्य झारखंड) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण

जळगाव नशिराबाद शिवारात नारायण पाथरवट यांचे शेत असून शुक्रवारी पाथरवट हे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यांच्या शेताजवळ ते फेरफटका मारत असतांना शेताच्या कडेला त्यांना मानवी कवटी व हाडे आढळून आले. पाथरवट यांनी लागलीच घटनेची माहिती नशिराबाद पोलिसांना दिली.

VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…

त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी आपल्या सहकार्र्‍यांसोबत घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. यावेळी मानवी कवटीच्या बाजूला आधारकार्ड, सॅमसंग मोबाईल अशा वस्तू आढळून आल्या.

त्यानुसार मयत व्यक्ती हा रामा उराव (वय-52, रा. मोकार्या जि. लोहरदगा राज्य झारखंड) असे असल्याचे दिसून आले. त्या संदर्भात पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या