Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Crime News : वादग्रस्त पत्रकामुळे नाशकात तणाव; पोलिसांनी केली तात्काळ कारवाई

Nashik Crime News : वादग्रस्त पत्रकामुळे नाशकात तणाव; पोलिसांनी केली तात्काळ कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील पंचवटी (Panchvati) येथील राजवाडा परिसरात एका समाजकंटकाने एक आक्षेपार्ह मजकूर असलेले पत्रक वाटल्याने तेढ निर्माण झाला होता. या पत्रकामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी (Police) या समाजकंटकावर कारवाई करत त्याला ताब्यात घ्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या समाजकंटकाला ताब्यात घेतले. यामुळे परिसरातील तणावाची परिस्थिती निवाळली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाशकात आगमन

आज शनिवार (दि.२२) रोजी सकाळी पंचवटी परिसरातील फुलेनगर भागात ही वादग्रस्त पत्रके आढळली. त्यानंतर १०० ते १५० नागरिकांनी मोर्चा काढून घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. त्यामुळे पंचवटी परिसरासह दिंडोरी नाका परिसरात तणाव निर्माण झाला होता. तसेच यावेळी बहुजन समाज पार्टी,आरपीआय , वंचित बहुंजन आघाडी, भीम ब्रिगेड यांच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला होता. पंरतु, पोलिसांनी या समाजकंटकाला ताब्यात घेतल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला. याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके, अर्जुन पगारे, प्रशांत जाधव यांनी पोलिस स्थानकात तक्रार दिली होती.त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता वैयक्तिक वादातून अद्दल घडवण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले.

हे देखील वाचा : Nashik News : सिंहस्थ तयारीचा विभागनिहाय आढावा

दरम्यान, सदर प्रकरणातील मुख्य आरोपीने तयार केलेल्या पत्रकामधून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणे हा उद्देश नसून पत्रकामध्ये नमूद असलेला व्यक्ती व मुख्य आरोपी यांच्यात वैयक्तिक वाद होता. त्यामुळे सदर पत्रकावर छापण्यात आलेल्या इसमाला त्रास व्हावा या उद्देशाने पत्रके तयार करून वाटण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे. तसेच याप्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीविरुद्ध सबळ पुरावे आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...