Saturday, November 9, 2024
Homeजळगावअमळनेरात आढळला विषारी पोवळा जातीचा दुर्मिळ साप

अमळनेरात आढळला विषारी पोवळा जातीचा दुर्मिळ साप

अमळनेर – प्रतिनिधी Amalner
शहरातील अयोध्यानगर भागात दुर्मिळ जातीचा मात्र कोब्रा पेक्षा पाच पटीने विषारी जातीचा साप आढळून आला.

दि.९ जुलै रोजी अयोध्यानगर भागात म्हशींच्या गोठयाजवळ तपकिरी रंगाचा साप दिसल्याने सर्पमित्र कृष्णा पाटील याला बोलवण्यात आले. सर्प मित्र कृष्णा पाटील याने उपलब्ध ज्ञानानुसार हा पोवळा (स्लेण्डर कोरल) जातीचा साप असल्याचे ओळखले.

- Advertisement -

हे देखील वाचा : अज्ञात वाहनाच्या धडकेने रिक्षाचालकाचा मृत्यू

काळाच्या ओघात ही जात नष्ट होत चालली आहे. कोब्रा जातीपेक्षा पाचपट विषारी साप असून त्याच्या तोंडाचा भाग मानेपर्यंत काळा असतो. पोटाचा भाग नारिंगी तर शेपटीच्या टोकाजवळ काळे ठिपके असतात.

हा साप लहान किडे, अळ्या आणि लहान कीटकांची अंडी खातो. प्रथम दर्शनी त्याचे तोंड नेमक्या कोणत्या दिशेने आहे हे समजत नाही. कृष्णा पाटील याने हा साप पकडून जंगलात सोडला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या