Tuesday, July 23, 2024
Homeजळगावअज्ञात वाहनाच्या धडकेने रिक्षाचालकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेने रिक्षाचालकाचा मृत्यू

जामनेर – प्रतिनिधी jamner
येथील शास्त्री नगर मधील रहिवासी तरुण हेमंत समाधान माळी, वय 25, राहणार शास्त्रीनगर जामनेर हा रिक्षाचालक तरुण काल मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास पहूर वरून जामनेरला घरी परत येत असताना पाचोरा रोडवरील इंडिया गार्डन पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या रिक्शाला जोरदार धडक दिली.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाल्यात चेंडू काढायला गेलेला बालक वाहून गेला

या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षातील तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. मयत हेमंत हा शहरातील शास्त्रीनगर मध्ये आई, वडील, दोन बहिणी, यांच्यासह राहत होता.

हे देखील वाचा : वाघझिरा येथील महिलेला सर्पदंश ; सर्वात विषारी सर्पाने केला दंश

रिक्षा चालवून तो परिवाराचा उतरनिर्वाह करीत होता. आई-वडिलांना एकुलता एक असल्याने कुटुंबाची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या जाण्याने परिवाराला मोठा धक्का बसला आहे. याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या